❤️
असाही प्रपोज...
▪️
शाळा सुटल्यावर रस्त्यावर भेटली ती त्याला...
सोडा रस्ता ताई प्लीज तो तिला म्हणाला..
हात अचानक धरला त्याचा, म्हटली ती नार
प्रेम तुझेही आहे कारे? मरते तुझ्यावर
चेहऱ्यावरती घाम दाटला गडी भलता भ्याला
सोडा सोडा ताई प्लीज... जाऊ दया ना! म्हणाला
म्हणे नार मी उत्तर घेईन तेव्हाच जाईन घरी
कुणालाच मी सांगणार नाही ठार मारले तरी!
म्हणे भावडया, का हो ऐशा गरीबाला नाडता?
घरी कळले तर, फार बडवतील, का हो फशी पाडता?
नार म्हणाली, आवडतो तू मजला मनातूनी
तुझ्याच नावावरुन चिडविती, मजला साऱ्या जणी
तुम्हाकडे ना कधी बघितले येता जाताना
कधी अडवला रस्ता तुमचा शाळा सुटताना?
हाच नेमका स्वभाव राजा आवडला रे मला
हो ना माझा व्हॅलेंटाईन, लाजाळूच्या फुला
मी तर पडलो सांब सदाशीव एकुलता एक
फादर माझे महाभयानक मला त्यांचा धाक
प्यार किया तो डरना क्या रे, ठाऊक नाही का तुला?
होकार घेईन तेव्हाच सोडीन, माझ्या लाडक्या मुला
वेळ जरा द्या सांगून बघतो माझ्या घरच्यांना
तुम्हीही या पण उदया विचारुन, मम्मी पप्पांना
आईबापाचे नाव काढता घाबरली नार...!
'जा रे डुचक्या' म्हणत पळाली, झाली तडीपार !!..
- राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224