कविता, गझल, अनुभव, व्यक्तिविशेष, व्याख्याने, सुसंवाद, भाषानुवाद, इंग्लिश ट्रान्सलेशन आणि बरंच काही! Inspiring minds through words, wisdom, and stories.
Wednesday, January 29, 2025
ये 'इ-पब्लिक' है!
Sunday, January 26, 2025
तिरंगा
हिमशिखरांच्या माथ्यावरती डौलाने फडकतो
एक तिरंगा अखंड हिन्दुस्थानाला पोसतो!
स्वातंत्र्याचे प्रतीक, आमच्या अभिमानाची भाषा
एकजुटीचे निशाण आमच्या जगण्याची अभिलाषा
भारतभूच्या जयकाराला गर्वाने गर्जतो
एक तिरंगा अखंड हिन्दुस्थानाला पोसतो
देशाच्या रक्षणास आहे तत्पर सदा तिरंगा
शत्रूच्या गोळीला देई उत्तर सदा तिरंगा
शूरवीरांच्या खांद्यावरती तेजाने तळपतो
एक तिरंगा अखंड हिन्दुस्थानाला पोसतो
जात धर्म पंथाहून आहे प्रत्येकाला प्यारा
भारत माता की जय म्हणता, अंगा येई शहारा
पुढारलेल्या देशांच्या पंक्तीत आता बैसतो
एक तिरंगा अखंड हिन्दुस्थानाला पोसतो
नव्या पिढीच्या स्वप्नांमागे भक्कम उभा तिरंगा
रोज नव्या क्षितिजांना गाठत असतो नवा तिरंगा
चिल्यापिल्यांच्या छातीवरही पहा कसा शोभतो
एक तिरंगा अखंड हिन्दुस्थानाला पोसतो!!
- राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224
जयहिंद.
Wednesday, January 22, 2025
चालण्याची गोष्ट!
Wednesday, January 15, 2025
किमान बोला
Wednesday, January 8, 2025
धरसोडपुराण
◾
धरसोडपुराण!
नवीन वर्ष लागल्यापासून बऱ्याच जणांनी काहीबाही सोडण्याचा धडाका लावला आहे. कोणी म्हणे नवीन वर्षापासून चहा सोडलाय. कोणी बिडीपुडी सोडली आहे. कुणी सिगारेटला रामराम केलाय. कुणी बायकोमैत्रीणप्रेयसीच्या धाकाप्रेमाशब्दापोटी दारू सोडली आहे. कुणी काय सोडलं आहे तर कुणी काय. सोप्पंय. मी स्वतः आतापर्यंत शंभर वेळा चहा सोडलाय. पण चहाने मला कुठे सोडलंय? जेव्हा चहा मला सोडेल तेव्हा खरं! आता हा लेख लिहिताना मी चहाचा एक झुरका घेतला आहे ही बात अलहिदा!
काहीतरी सोडण्याची, त्यागण्याची तयारी दाखवणं म्हणजे आपल्यातल्या चांगल्या माणसाचं जागृत होणं असतं. कुठल्यातरी मुहूर्तावर आपल्यातला हा चांगला माणूस जागा होतो, ही चांगली गोष्ट आहे. पण हा चांगला माणूस काही दिवसांतच पुन्हा का ढेपाळतो काही कळत नाही! म्हणून चहा सोडलेला इसम काही दिवसांनी पुन्हा चहा पिताना दिसला तर त्याला नावं ठेवू नका. फक्त स्माईल करा!
खरोखरच जर एखाद्याला एखादी गोष्ट सोडायची असेल तर तो तिचा जाहीर प्रचार करत बसत नाही. लोकांना ते आपोआप कळतं. मुळात एखाद्या गोष्टीचा अगदी त्रास व्हावा इतकं अति करण्याची गरज काय? अजाणतेपणाने, इतरांच्या दबावाला किंवा तात्कालीक मोहाला बळी पडून नको ते शुक्लकाष्ठ आपण पाठीमागे लावून घेतलेलं असतं, त्याच्यापासून दूर होण्याची सुबुद्धी अशा एखाद्या समुहूर्तावर व्हावी यापेक्षा दुसरा सुवर्णयोग तो कोणता! माणसाला कोणीतरी सदगृहस्थ, सखा, मार्गदर्शक ऐन कोलमडण्याच्या क्षणाला भेटतो, कान टोचतो, चुकणारं पाऊल सावरतो! मग माणूस म्हणतो, या या मुहूर्तापासून मी ही गोष्ट सोडणार! शहाणा, समजदार असेल तर पुन्हा चुकीच्या मार्गाला जात नाही. अशा वेळी या सोडण्यालाही अर्थ प्राप्त होतो. ज्यांना हे जमणे नाही त्यांच्या पालथ्या घड्यावर कितीही पाणी ओतलं तरी तो भरणार थोडाच आहे?
काही गोष्टींना सोडायलाच हवं असंही काही नसतं. त्यांना आपल्या आयुष्यात आनंदाची चिमूटभर समांतर जागा देऊनही आयुष्य सुखकरपणे पुढे नेता येऊ शकतं. परंतु हा समतोल फार कमी लोकांना साधता येतो.
जे स्वतःहून विचारपूर्वक स्वीकारलं आहे, कष्टाने कमावलं आहे, जीवापाड जपलं आहे, ज्याच्यासाठी आयुष्याची काही वर्ष खर्च केली आहेत, अशा गोष्टीवरही कधीकधी जड अंत:करणाने पाणी सोडावं लागतं. अशा गोष्टी सोडताना माणसाचा नवा जन्म होत असतो. वरवर पाहता या गोष्टी सोडल्यासारख्या वाटतात, परंतु त्या सुटत नाहीत. आजन्म माणसाची सोबत करत राहतात. त्याच्या मनात राहतात.
या धरण्यासोडण्याच्या घाईत ज्यांना गमवायला नको होतं अशी माणसं आपल्याकडून चुकूनही दुखावली, दुरावली जाऊ नयेत, याची काळजी घ्यायला हवी. कारण अशी माणसं आपल्याला दुखावत नाहीत, परंतु आपल्या आयुष्यातून इतक्या बेमालुमपणे निघून जातात, की ते कळेपर्यंत खूप उशीर झालेला असतो. नंतर केवळ पश्चाताप उरतो. आनंद बक्षी साहेबांच्या शब्दांत सांगायचं झालं तर,
बाद में प्यार के चाहे भेजो हजारो सलाम...
वो, फिर नहीं आते!
-
प्रा. राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
भ्रमणसंवाद - 9423542224
Thursday, January 2, 2025
नवीन वर्ष
वास्तांगुणाहूंया!
🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, ▪️ *वास्तांगुणाहूंय...
-
◾ *फोनपुराण!* _एक मुद्दा, एक विचार!_ _24 डिसेंबर, बुधवार_ _लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक._ ▪️ *फोनपुराण!* अर्थात...
-
◾ *मोडला ‘आहे’ कणा?* _एक मुद्दा, एक विचार!_ *१५ जुलै २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, नाशिक. ▪️ *मोडला ‘आहे’...
-
◾ *अरे संसार संसार, जसे कपबशीचे घर* _एक मुद्दा, एक विचार!_ _21 जानेवारी 2026, बुधवार_ _लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, ना...