सौंदर्याला कधीच नसते गं ची बाधा
सौंदर्यातून गंध पसरतो मांगल्याचा
सुंदर असते माय, माऊली, भार्या, ताई
असंख्य रूपांमधून असतो वावर त्याचा
सुंदर आहे जे जे तुजला दिसते आहे...
नजर असुदे तशी; येतसे प्रत्यय त्याचा
जगणे म्हणजे सुंदर कोरीव शिल्प रुपेरी
गालावरती त्याच्या शोभे तीळ दुःखाचा!
असशील सुंदर, तर ध्यानी धर, इतके केवळ
काढ मनातून गर्व तुझ्या सुंदर असण्याचा!
केवळ सुंदर दिसण्यामध्ये गौरव नाही
गौरव येथे होतो नेहमी माणुसकीचा!
-
राजेश्वर पांडुरंग शेळके, नाशिक
9423542224
No comments:
Post a Comment