Thursday, December 31, 2020

Practise Grammar.

*Practice Time*
31/12/2020
*Choose the correct alternative.*
1. Why ( are/am ) you selling these Bananas? 
2. Where( is/are ) he going for shopping?
 3. Who (were/ was ) the person guiding you?
 4. When ( are/ is ) your father going for office?
5.  Where (were/ was  ) your friend staying those days?
6. How ( were/ was ) you doing this?
7.  In what condition ( was/ were ) he walking along the road?
8.  Whose shoes ( was/were ) your friends  stealing?
9.  Why( do/ does ) you call me stupid?
10. Where ( do/does) your sister work? 
11. When ( do/does) we celebrate the Independence Day?
12.  How (does /did ) you come to know about this?
13.  Where ( do/did ) he keep his secret bag?
14. Who( have/ has ) complained against you?
15.  When( has/ have )you started for the journey?
16.  Why ( have/ has )my father scolded you?
17. When ( had/ has ) you taken my permission?

✒️
Prof. Raj Shelke, Nashik
9423542224
HTTPS//:profrajshelke.blogspot.com

Sunday, December 20, 2020

घाबरू नकोस


*घाबरू नकोस...*

अचकट विचकट चेहरा करून
संकट जेव्हा धावून येईल,
धास्तावलेला चेहरा तुझा
निस्तेज होईल, सुकून जाईल...

तारेवरची कसरत तुझ्या
जीवावरती बेतून जाईल
हातामधली आधारकाठी
अर्ध्यावरतीच तुटून जाईल...

रात्रंदिवस विचार करशील,
मन-मेंदू जड होईल...
मनगटाच्या बळालाही
अशक्ताची कड येईल...

सगळी ताकद लावशील,
तरीही हाती फक्त शून्य राहील
कुठे चुकलं कळणार नाही,
मस्तक एकदम सुन्न होईल...

अपमानाचे बोल सोसून
जिणे जेव्हा हराम होईल,
बेईमानीच्या हाताखाली
इमान तुझं गुलाम राहील...

परिस्थितीच्या रेट्यापुढे
डोळ्यात पाणी भरून येईल,
भांबावलेलं रानपाखरू
पाण्यासाठी झुरून जाईल...

लहानसहान गोष्टींमध्येही
अपयश तुला खेटून जाईल,
'सूड घेईन...' म्हणून जेव्हा
खवळेल मन, पेटून जाईल...

तेव्हा,
घाबरू नकोस,
शांत हो!
ती वेळही निघून जाईल...!!

अंधाराला दचकू नकोस,
काळ का हा असाच राहील?
आकाशातली वीज बन,
सूर्यही मग तुझाच होईल...!

पुन्हा नव्याने सुरुवात कर,
विसर गेलेला काळ...
पुन्हा पेटू दे काळजामधला
विझत चाललेला जाळ...

भेकडासारखं रडून कुठे
मोठं होता येतं का?
पंख आखडते घेऊन
आभाळ कवेत घेता येतं का?

विचारपूर्वक निर्णय घे,
मग मांड पटावर डाव
भविष्याच्या ताम्रपटावर
झळकव तुझेच नाव...!

कोणीतरी तुझ्या पाठीशी
भक्कम आहे, विश्वास ठेव
डोळे मिट, दिसेल तुला
तुझ्या देव्हाऱ्यातला देव...

एक कर पण...

एक कर पण, धीर धर
हास जरासा...बघ वर...

डोळ्यांमधल्या आसवांना जमण्याआधीच पुसून टाक,
परिस्थितीशी लढण्यासाठी
मर्दासारखा उभा ठाक!

*एवढं सगळं करतानाही*
*सांभाळून रहा...तोल जाईल!*
*घाबरू नकोस पण,शांत हो!!*
*अरे, ती वेळही निघून जाईल !!*

✒️
*प्रा. राजेश्वर (राज) शेळके, नाशिक*
*सुसंवाद:94235 42224*

Friday, November 20, 2020

दुनिया


दुःखाचे गाठोडे पेलत जगते दुनिया
तरी हासते किती बहाणे करते दुनिया

कुठे जराशी जागा मिळता टेकायाला
हळूच ओझे हलके थोडे करते दुनिया

तोल तिचाही हजार वेळा ढळतो येथे
सावध होते, पुन्हा पुन्हा सावरते दुनिया

तिच्या मनाच्या खोल तळाचा हा गाभारा 
रोज नव्या स्वप्नांना येथे पुरते दुनिया 

जमेल तितके सांगत असते तुला मला ही 
सोबत घेउन बरेच काही मरते दुनिया 

कधी कुणाला उचलून घेते खांदयावरती 
कधी कुणाच्या सरणावरती चरते दुनिया 

तुला वाटते तितकी दुनिया सोपी नाही
लाखामधल्या एखादयाला कळते दुनिया!

-राजेश्वर शेळके
नाशिक
9423542224

Tuesday, November 10, 2020

एक कप्पा शेवटी


खूप झाली कौतुके आनंदही झाला जरी
एक कप्पा शेवटी दुखराच त्याचा राहिला!
- _राजेश्वर शेळके,नाशिक_
_9423542224_

Friday, October 30, 2020

लाजसुद्धा ऐनवेळी सोडता यावी...


लाजसुद्धा ऐनवेळी सोडता यावी
चेहऱ्यावर वक्र रेषा ओढता यावी

खेळ केला जर कुणी मुद्दाम भिडले तर
एक खेळी मग तुलाही खेळता यावी

ना कुणीही स्वच्छ धुतल्या तांदळाजोगा
फक्त अपुली घाण तितकी झाकता यावी!

कारणे परिणाम नंतर सांग दुनियेला
वेळ आलेली तुला निस्तारता यावी

कैक वळणांचा निसरडा घाट हे जगणे
तोल सांभाळून गाडी रेटता यावी

फेकला जाशील जेव्हा दूर वाऱ्यावर
स्वार हो! बस हीच संधी साधता यावी!

एकदम नाही सुचायाची तुला कविता
आतली खळबळ अगोदर ऐकता यावी

राजेश्वर शेळके, नाशिक
9423542224

Sunday, October 4, 2020

दोघांसाठी हेच केवढे सुखकर आहे




दोघांसाठी हेच केवढे सुखकर आहे
तुझ्या नि माझ्यामधे पुरेसे अंतर आहे

जरा स्वतःच्या आत तळाशी डुबकी मारा
कळेल मग हा खोल किती भवसागर आहे

ज्या दारावर कुणी सुखाची भीक मागतो
दुःख हासते, म्हणते, हे माझे घर आहे!

सांगा थकलेल्या पायांना, थोडे सोसा
मखमल अंथरलेला रस्ता नंतर आहे!

किमान इतके ओळखण्याची बुद्धी लाभो
कोण कुणाच्या जगण्यामधला अडसर आहे

जो जो जितका जितका धार्मिक बनला येथे
सोज्वळ होता आधी, आता कट्टर आहे

मृत्यू जेव्हा स्पर्शून जातो तेव्हा कळते
जगणे हा तर मृत्युच्या वरचा थर आहे!

-राज शेळके, नाशिक
profrajshelke.blogspot.com
9423542224

वास्तांगुणाहूंया!

🔳 *वास्तांगुणाहूंया!* _एक मुद्दा, एक विचार!_ *५ ऑगस्ट २०२६, बुधवार* लेखक - राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके,  ▪️ *वास्तांगुणाहूंय...